Tuesday, March 4, 2008

मनाचं आभाळ असं अवचितपणे दाटून येतं,
काही काही सुचत नाही सारं सारं सुन्न होतं.
अचानक मग आठवणींचा पाऊस अनिर्बंधपणे कोसळायला लागतो.
पण आठवणींच्या पावसात असं फार काळ भिजू नये,
भिजलं असलं मन तरी फार ओलं ठेवू नये...
अशानं मनाला सर्दीचा फार फार त्रास होतो,
वर्तमानात जगतानाही भूतकाळाचा भास होतो.....
साधं सोपं आयुष्यसाधं सोपं जगायचंहसावंसं वाटलं तर
हसायचंरडावंसं वाटलं तर चंद्र मोठात्याचं कौतुक कशाला
एवढंजगात दुसरं चांदणं नाहीआपल्या हसण्या एवढं!
आपणच आपलं चांदणं बनूनघरभर शिंपत रहायचं

No comments: