तुझी आठवण येते......
वाटतोस मला तू खुप हवाहवासा
अनुभवते स्पर्श तुझ्या शब्दांचा
तू बोलावे अन मी ऐकावे
तुझ्या सानिध्यात दिवस घालवावे
नदिला घ्यावासा वाटतो स्पर्श सागराचा
तसा हवासा वाटतो स्पर्ष तुझ्या शब्दांचा
नकळत तुझ्याकडून बरेच काही मिळाले
पण तू मध्येच सोडून गेलास
आता तुझ्या आठवानित रमावे
हे बोलायासाठी तरी तू भेटावे
प्रेम केले मी तुझ्यावर पण कधीही नाही सांगितले
माझ्या नजरेतुन नाही का तुला वाचता आले
तुझी आठवण येताच मन व्याकुल झाले
आणि अश्रू गालावरून अलगद बरसू लागले.....
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment