फुले शिकवतात......
गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;
रात रानी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं;
बकुळी म्हणते,सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;
मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;
कमळ म्हणतो,संकटात चिखलात बुडायचं नसतं,
संकटांना बुडवुन फुलायचं असतं
Sunday, January 11, 2009
प्रेम म्हणजे सुगंध,
प्रेम म्हणजे तिच्या मनात,
आनंदाने वाजणारा मृदुंग प्रेम म्हणजे पाउस,
प्रेम म्हणजे, तिने त्याला म्हणन थांब रे जरा,
तू नको इतक्यात जाउस,प्रेम म्हणजे हिरवल,
प्रेम म्हणजे मृगजल प्रेम म्हणजे अथांग सागर,
प्रेम म्हणजे वाहणारी घागर,
प्रेम म्हणजे हिरवीगार धरती,
प्रेम म्हणजे नदीला आलेली भरती,
प्रेम म्हणजे वाहता झरा,प्रेम म्हणजे फुलांचा सडा,
प्रेम म्हणजे त्याने तिला स्वप्नात पाहण,
प्रेम म्हणजे तिने त्याच्या हृदयात रहाणे,
प्रेम म्हणजे त्यांच दोघंचही एकमेकांशी वाद घालणे,
प्रेम म्हणजे त्यानी जवळ घेतल्यावर तिने गालातल्या गालात लाजुन हसने,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते,
तुझ काय माझ काय,सर्वांचच ते सेम असते ....

Subscribe to:
Posts (Atom)